Home / इतर / कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार बद्दल माहिती 

दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते.

जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा मदत करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत व त्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या शेती क्षेत्रात मोठी कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना तसेच  महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत  डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न  पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

१. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार :

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषि विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच पुरस्कार
आहे. या पुरस्कारासाठी निवड होणा-या व्यक्ति / गट /संस्थेस रु.७५०००/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह,
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे स्वरुप आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी निकष –


१) हा सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्ति/ गट /संस्थेस देण्यात येतो त्याअनुषंगाने व्यक्ती/गट/संस्था यांचे
कार्य अति उल्लेखनीय असावे.

२) सर्वसाधारणपणे मागील २०-२५ वर्षामध्ये शेतीचा अनुभव असलेल्या व्यक्ती/ गट/ संस्थेला प्राधान्य.

३) व्यक्ती /गट/ संस्थेचे कृषि उत्पादन, कृषि विस्तार, निर्यात,कृषि प्रक्रीया,पीकफेर बदल, कृषि उत्पादन वाढीसाठी
वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष विचार करावा.

४) कोरडवाहू क्षेत्राताल कार्य आणि कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करणे आवश्यक.

५) सदर पुरस्कारार्थीच्या शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा इतर शेतक-यांना होणारा फायदा

६) कृषि विपणन, प्रक्रिया, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब, याबाबतचे कार्य इतर शेतक-यांना मार्गदर्शक असावे.  


७) कृषि क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.

८) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त
अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत
संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/संस्था पात्र असणार नाही.

९) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्ष पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.

१०) प्रस्तावीत शेतकरी /गट/संस्था शेतकरी मासिकाचे सभासद असावेत.

११) प्रस्तावासोबत मूळ प्रतीत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला,   

स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.

१२) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.

१३) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इत्यादि  बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. पिकस्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी  इत्यादि उपक्रमामध्ये सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात उद्युक्त करणारा असावा. पिक स्पर्धा , प्रदर्शने  इत्यादि मधील सहभाग/पारितोषिक इत्यादिचा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!