Home / शेती (Agriculture) / कृषी पुरस्कार : जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

कृषी पुरस्कार : जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

जिजामाता कृषिभुषण पुरस्कार :-

राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार

मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळ महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब आहे. तसेच शेती क्षेत्रातील

महिलांचा वाढ़ता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित

होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातुन दरवर्षी पाच महिला शेतक-यांची या

पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख

आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जिजामाता कृषिभुषण पुरस्कारासाठी  निकष :-

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणा-या महिला शेतकरी असाव्यात आणि  त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला

दिशादर्शक असावे.

२) प्रस्तावीत महिला शेतकरी ही वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी असावी.

३) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्ष पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.

४) कृषि क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे .

५) शासकोय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेबर काम करणारे किंवा सेवानिवृत्त

अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत

संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/संस्था पात्र असणार नाही.

६) प्रस्तावीत महिला शेतकरी ही शेतकरी मासिकाचे सभासद असावी.

७) राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील तथापी केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य देण्यात येते.

८) महिला शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि त्या कुटुंबीयासह शेती करणार्या असाव्यात.

९) यशस्वी उत्पादन, रोपवाटीका, बिजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पैकहाऊस,साठवणूक, मूल्यवर्धन,प्रक्रिया,विपणन ,निर्यात इत्यादि कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारी व अधिक नफा मिळविणारी महिला असावी.

10) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात  इत्यादि  बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारी असावी. पिक स्पर्धा, प्रदर्शन,मेळावे,संशोधन संस्थांना भेटी  इत्यादि  उपक्रमामध्ये सहभागी होणारी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारी तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात सहभागासाठी उद्युक्त करणारी असावी. पिक स्पर्धा , प्रदर्शने इ.मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

11) शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

12) पतीला मिळालेल्या पुरस्काराकरीता पत्नीला पुन्हा नव्याने अर्ज करता येणार नाही.

13)प्रस्तावासोबत मूळ प्रतीत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.

14) जिल्हास्तरीय समिती मार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!