Home / शेती (Agriculture) / कृषी पुरस्कार :-कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार

कृषी पुरस्कार :-कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार

 कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार:-

सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 50000/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढावा यासाठी शासनाने २००९ सालापासून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराला सुरुवात केली आहे.

शेतीमध्ये रासायनिक खते व औषधींच्या आती वापरामुळे जमिनीची भरपूर नुकसान होत आहे. याचा  मोठा परिणाम मानवी आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत असूनविविध आजारांना रोगना आमंत्रण दिले जात आहे. भविष्यात ही हानी रोखण्यासाठीतसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. तसेच सरकारचे रासायनिक खतांवर पण परकीय चलन मोठ्या प्रमाणत खर्च होत आहे य्मुळे सरकारची परकीय गंगाजळी कमी होत आहे म्हणून  शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अवास्तव वापर थांबवून सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढावा यासाठी शासनाने २००९ सालापासून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराला सुरुवात केली आहे.

राज्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनातसेच सामाजिक संस्थांना शासनामार्फत सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी ५०,०००/-  रुपये रोख रक्कमस्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्रतसेच सपत्नीक सत्कारअसे या पुरस्काराचे स्वरूप आहेया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी यासाठी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. राज्यातून एक संस्थातसेच प्रत्येक विभागातून एक शेतकरी यांची  कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)

कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कारचे निकष-

1)  सेंद्रिय शेतीचे PGS किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणीकरण केलेले असावे.

2) सेंद्रीय शेती स्पर्धा,प्रदर्शने,चर्चासत्रे, सेंद्रीय शेती मेळाव्यातील मार्गदर्शन इत्यादि मधील सहभाग/पारितोषिका बाबतचा  तपशील पुराव्यासह देण्यात यावा. त्याबाबतची छायाचित्रे, प्रमाणपत्र  इत्यादि  सादर करणे आवश्यक राहील.

3) सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. सेंद्रीय शेती तंत्रज्ञान प्रसाराबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे, त्याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वत: सेंद्रीय शेती गटाच्या माध्यमातून,कार्यशाळामधुन, प्रदर्शनातील सहभाग, सेंद्रीय शेती प्रचार व प्रसारासाठी केलेले कार्य इत्यादीतून कार्य केलेले असावे.

4)स्वत:चा शेतमाल सेंद्रीय म्हणुन विक्री केलेली असावी. त्या पद्धतीचा ब्रँड असल्यास तपशील द्यावा.

5) गांडूळ कल्चर/ गांडूळ खत यूनिट च्या माध्यमातून सेंद्रीय खत तयार करुन त्याचा वापर स्वत: करणारा असावा तसेच इतर शेतकरी यांनाही प्रोत्साहन देणारा असावा.

6)बायोडायनामिक  कंपोस्ट/नाडेप यासारख्या सुधारित पद्धतीने सेंद्रीय खत तयार करुन स्वत:च्या शेतामध्ये वापरणारा असावा. रासायनिक पदार्थांचा वापर न करता आणि बाजारातून सेंद्रीय निविष्ठा खरेदी न करता स्वतःच्या शेतावर दशपर्णी अर्क, जिवामृत, बीजामृत, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर यासारख्या सेंद्रिय निविष्ठा वापरणारा असावा.

7) पिक संरक्षणासाठी एकत्मिक किड व्यवस्थापन, जैविक किटकनाशके,विविध पिक पद्धती, वनस्पतीजन्य किटकनाशके वापरणारा असावा.

8) सेंद्रीय शेती पद्धतीचा किमान पाच वर्ष अवलंब केलेला असावा. सेंद्रीय शेती/शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण केले असल्यास प्राधान्य देण्यात यावे. परिसरातील शेतकरी यांचे समवेत समूह पद्धतीने सेंद्रीय शेती करुन सेंद्रीय शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेतृत्व करणारा असावा.

9)शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.

10) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

11) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

12)प्रस्तावासोबत मूळ प्रतीत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.

कृषी भुषण सेंद्रीय शेती पुरस्कारासाठी संस्थेसाठी निकष-

1) संस्था नोंदणीकृत असावी( स्थापना झाल्याचा रजिस्ट्रेशन नंबर व दिनांक असणे आवश्यक आहे).

2) संस्थेकडे असलेले तांत्रिक मनुष्यबळ तपशिलासह( शैक्षणिक पात्रता,अनुभव,अवगत केलेले तंत्रज्ञान, तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण इ.) माहिती असावी.

3) संस्थेने सेंद्रीय शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये भरीव कामगीरी केलेली असावी.

4) संस्थेचे कार्यक्षेत्र दर्शविणारी माहिती असावी.

5) संस्थेचे एकुण सभासदांची संख्या नमुद करण्यात यावी.

6)संस्थेचे ऊद्देश,संस्थेची घटना/नियमावली इ.माहिती असावी.

7)संस्थेशी संलग्न इतर संस्थांची माहिती असावी.

 

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!