ई-श्रम कार्ड

ई-श्रम कार्ड

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी भारत सरकारने नवीन योजना आणल्या आहेत. खरे तर कामगारांचे हित लक्षात घेऊन भारत सरकारने  “ई-श्रम पोर्टल” सुरू केले आहे. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर कामगारांनी आपली नोंदणी सुरू केली आहे. भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरून, या पोर्टलवर आतापर्यंत ८ कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. या सरकारी योजनेच्या मदतीने सर्व कामगारांना “लेबर कार्ड” दिले जात आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

आपल्या  देशभरात जवळपास ३८  कोटींवर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची संख्या आहे. मात्र, या योजनेचा म्हणवा असा अद्याप प्रचार आणि प्रसार झालेला नाही. त्यामुळे केवळ ८  कोटी मजुरांचीच नोंदणी  भारत सरकारने दिलेल्या पोर्टलवर (https://eshram.gov.in/) झालेली आहे. महाराष्ट्रात प्रशासनाला १२ लाख नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे . या पैकी केवळ 52 हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. नोंदणी वाढवण्यासाठी  असंघटित क्षेत्रात काम करणऱ्या मजुरांची नोंदणी करुन त्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे.

ई-श्रम कार्ड काय आहे . 

आपल्या  देशातील कष्टकरी नागरिक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, कुमकुवत आहेत, ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. भारत सरकार त्यांना अनेक प्रकारे मदत करते. हाच पुढाकार घेऊन  भारत सरकारने  असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. देशात काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेऊन ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ई-श्रम कार्ड नोंदणी करून, सर्व कामगारांना एक  ई-श्रम  कार्ड  दिले जाईल, हे कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या  कामगारांसाठी खूप महत्वाचे आहे.

ई-श्रम कार्डसाठी पात्रता /अटी 

संघटित क्षेत्रात काम करणारा कामगार हा भारताचा  यमचे नागरिक असणे आवश्यक आहे.

तुम्ही आयकर भरणारे नसावे.

लाभार्थीचे वय 16 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जारी केलेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

ई-श्रम पोर्टलवरील  ई-श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी शुल्क CSC मध्ये प्रति नोंदणी 20 रुपये असेल तर अर्ज शुल्क विनामूल्य आहे.

तुम्हाला ई-श्रम योजनेसाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागेल, म्हणजे eshram.gov.in.

तुमच्याकडे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आधार कार्डसह बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासासोबतच काही छोटी कामे केली तर त्याला त्याचे ईश्रम कार्ड बनवता येईल. यासाठी त्याचे वय किमान १६ वर्षे असावे.

ई-श्रम कार्ड चे फायदे –
  1. भारत सरकारने२६ ऑगस्ट २०२१  रोजी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली.
  2. ई-श्रम योजनासाठी २०२२ लासरकारने ४०४ कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे.
  3. असंघटित क्षेत्रातील सर्व प्रकारचे कामगार ई-श्रम  योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  4. ई-श्रमयोजनेतील लाभार्थ्यांना २ लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा प्रदान केला जाईल तर अंशतः अपंग असलेल्यांनाही १ लाख रुपये मिळतील.
  5. प्राप्तिकर न भरणारी कोणतीही व्यक्ती ई श्रम कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र असेल.
  6. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य देखील सरकारच्या ई-लेबर कार्ड योजनेत समाविष्ट नाहीत.
ई-श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे 
  1. बँक खाते तपशील
  2. आधार कार्ड
  3. आधार लिंक सक्रिय मोबाइल क्रमांक (आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक)
  4. वय १६-५९  वर्षांच्या दरम्यान असावे.
ई-श्रम पोर्टल हेल्पलाइन

ई-श्रम नोंदणी आणि तक्रारींशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी राष्ट्रीय हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे. हेल्पडेस्कचा क्रमांक १४४३४ आहे. यावर कॉल करून तुम्ही कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकता.

असंघटित क्षेत्र म्हणजे काय?

असंघटित क्षेत्र म्हणजे, वस्तू किंवा उत्पादनाच्या विक्रीत गुंतलेल्या युनिट्स आणि स्वयंरोजगार, ज्यामध्ये दहा पेक्षा कमी कामगार आहेत यांचा समावेश होतो. ही युनिट्स ESIC आणि EPFO अंतर्गत येत नाहीत. अशा क्षेत्रात काम करणारा कोणताही कामगार असंघटित कामगार समजला जातो.

ई-श्रम कार्ड कसे काढावे 

ई-श्रम कार्ड साठी सर्वप्रथम  https://eshram.gov.in/  या वेबसाईट ओपन करावी.   या वेबसाईटच्या  मुखपृष्ठावर नवीन नोंदणी चा पर्याय आहे. यामध्ये रजिस्टर ला क्लिक करून सेल्फ रजिस्ट्रेशन करून आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर Captcha कोड हा टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP याला क्लिक करायचे आहे.

त्यानंतर मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर टाकायचा आहे. ओटीपी टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. यानंतर आधार कार्ड बाबतची माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.  सर्व अटी नियम मला मान्य आहे त्याला क्लिक करून सबमिट करायचे आहे.

याला सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच शैक्षणिक माहिती, महिन्याचा इन्कम आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे. तुमच्या व्यवसायाची माहिती द्यावी लागणार आहे. तुम्ही काय करता हे दिलेल्या पर्यायापैकी निवडावे लागणार आहे. यानंतर Save & Continue यावर क्लिक करून पुढील माहिती भरायची आहे.

पुढच्या स्टेप मध्ये बँकेत संदर्भात माहिती भरायची आहे. बँकेची पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण जो आतापर्यंत फॉर्म भरला आहे. तो आपल्यासमोर येईल. हा फार्म संपूर्ण एकदा तपासून शेवटी डिक्लेरेशन द्यायचे आहे यामध्ये सर्व घोषणा सर्व अटी नियम हे मला मान्य आहेत असे संबोधून शेवटी Agree वर क्लिक करायचे आहे. हे सबमिट केल्यावर तुमचे ई- श्रम कार्ड कसे असेल हे देखील पाहता येणार आहे. आपण ते  डाऊनलोड  ही करू शकता.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!