ई पीक पाहणी
शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद हि सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरु केली आहे.
शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे.
७/१२ उताऱ्या वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी मोठी मदत होते. यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर नोंद आसणे गरजचे आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर नोंद केलेली असेल तर शेतकऱ्याला संबधित विमा कंपनी किंवा महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी शेतकऱ्याने ई पिक पहाणी करणे गरजेचे आहे.
ई पिक पाहणी करणे म्हणजेच शेतातील पिकाची नोंद करणे होय. त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतातील झाडांची, पिकाची, विहीर, बोअरवेल, शेततळे, पडीक जमीन , अशा ७/१२ संबधित विविध नोंदी शेतकरी मोबाईल अँपमधून करू शकतो.
ह्या वर्षी म्हणजे २०२४-२५ ला १ ऑगस्ट पासून ई पिक पाहणी सुरु झालेली आहे. पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लेस्टोर वरून ई पिक पाहणी(DCS) Version ३.०.२ अपडेट करून घ्यावे.
ई पीक पाहणी नोंदणी कशी करावी?
ई पिक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने ज्या गटामधील पिकाची नोंद करायची आहे त्या गटामध्ये जावून नोंद करावी लागणर आहे. शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी करण्यासाठी शासनाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
शेतकरी स्वतः मोबाईल वरून ई पिक पाहणी अँप मध्ये नोंदणी करून पिक पाहणी करू शकतात.
ई पिक पाहणी सहाय्यक यांच्याद्वारे सुद्धा पिक पाहणी शेतकरी करू शकतात.
गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहाणी(E Peek Pahani) ॲप सर्च करून डाऊनलोड करावे.
अॅप ओपन करून त्यामध्ये महसूल विभागाची निवड करावी.
स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा.
नंतर तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करावी.
त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरून शोधा बटणावर क्लिक करावे.
तुम्हाला त्यामध्ये खातेदाराची निवड करायची आहे.
तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
नंतर त्यामध्ये पीक पेरणीची माहिती भरायची आहे व तुमच्या पिकाची निवड करायची आहे.
त्यानंतर पिकासाठी सिंचन साधन आणि त्याचा प्रकार कोणता आहे ते निवडायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला त्या पिकाचे फोटो अपलोड करायचे आहेत.
नंतर तुमच्या पिकाचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे फोटो अपलोड करायचे आहेत.
अशाप्रकारे तुमची ई पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
ई पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे आहे. तसेच संपूर्ण वर्षातील पिकाची नोंद करायची असल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षामध्ये कधीही नोंद करता येणार आहे. परंतु खरीप हंगामातील 2024 मधील ई पिक पाहणी करण्यासाठी 15 संप्टेंबर पर्यंत मुदत असणार आहे.