Home / नवीन योजना / अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४- २५

अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४- २५

Your paragraph text 1
अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४- २५

राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४- २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

राज्यातील महिला, बेरोजगार युवक-युवती यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
  • मुलीना व्यावसायिक शिक्षण मोफत.
  • पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प.
  • शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना.
  • सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम.
  • शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण.
  • महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये.
  • अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण.
  • “गाव तेथे गोदाम” ही शेतकर्यासाठी नवीन योजना या मुळे धान्य साठवणुकीचा प्रश्न निकाली निघेल.
  • कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार अर्थसहाय.
  • सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम.
  • मागेल त्याला सौर उर्जा पंप या योजना.
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत अर्थसहाय्य वाढविले.
  • विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधण्यासाठी तरतूत.
  • दिव्यांग व्यक्तींसाठी “धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना.
  • जागतिक वारसा नामांकनासाठी पंढरपूर वारी, कोकणातील कातळशिल्पे, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्ताव पटवणार.
  • रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार
  • पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये.
  • “निर्मल वारी” साठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू- आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत.
  • प्राधान्य क्षेत्रात आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक.
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रशिक्षण.
  • तंत्रशिक्षण संस्थांमध्ये “सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन करण्यात येणार.
  • मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत २३ हजार किमी रस्त्यांची कामे.
  • महापालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबवणार.
  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायत कार्यालये बांधणे व इतरही प्रमुख पायाभूत्त सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!