बॅटरी संचलित फवारणी पंप (Battery Favarni Pump – Battery Spray Pump)

बॅटरी फवारणी पंप  MahaDBT योजना 2024 :

 

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत बॅटरी संचलित फवारणी यंत्र (Battery Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे.

या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचलित फवारणी पंप (Battery Favarni Pump – Battery Spray Pump) अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी खालील महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
  •  आधार कार्ड
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  ७/१२ उतारा
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  स्वयं घोषणापत्र
पात्रता
  • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील
  • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा असावा
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
    बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती पहा

     

    शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

    https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

    शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

    आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

    वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

    पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.

    कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

    एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा

    कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

    मनुष्यचलीत औजारे हा पर्याय निवडा.

    यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून पीक सरंक्षण औजारे हा पर्याय निवडा.

    मशीनचा प्रकार मध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप (कापूस/गळितधान्य) प्रकार निवडा.

    योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा

    जतन करा या बटनावर क्लिक करा.

    तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा.

     

    बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.

    पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा.

    पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे.

    पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

    बॅटरी फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस कसे बघायचे.

    महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.

    तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

    छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.

    अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी फवारणी पंपासाठी (Battery Favarni Pump) अर्ज सादर करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

    महाडीबीटी पोर्टल : https://mahadbt.maharashtra.gov.in/
    महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप : महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
     

     

    Share on WhatsApp

    नवीन योजना

    Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
    © Mahiti In Marathi | All rights reserved